१. मुळशी तलाव आणि धरण (अंदाजे ४० किमी)
हिरवागार निसर्ग , धबधबे आणि सह्याद्रीच्या डोंगर रांगांनी वेढलेले व गडकिल्ल्यांचा चा वारसा लाभलेले एक उत्तम ठिकाण म्हणजे मुळशी.
फोटोग्राफी च्या स्थळासाठी फोटो प्रेमी ची पाहली पसंद मुळशी लाच मिळते.
२. लवासा (अंदाजे ६० किमी)
हे शहर इटालियन शहर पोर्टोफिनो यावर आधारित हा एक खाजगी शहर आहे . ज्या मध्ये पोर्टोफिनो शहराचे नाव असलेल्या अनेक इमारती आहेत. व पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी एक उत्तम हिल स्टेशन म्हणुन ओळखले जाते
3. लोणावळा आणि खंडाळा (अंदाजे 65 किमी)
तिथे दोन एकत्र हिल( डोंगर ) एक प्रमुख आकर्षण आहेत. टायगर पॉइंट, भूशी धरण, कार्ला आणि भाजा लेणी, धबधबे,विसापूर व लोहगड अशे छ. शिवाजी महाराजांच्या काळातील गडकिल्ले यासारख्या आकर्षणांसह पर्यटकांना आकर्षित करतात.
४. पवना तलाव (अंदाजे ५० किमी)
पवना तलाव मुख्यत नाईट कॅम्पिंग व बोटींग साठी प्रसिद्ध आहे .
तिथे धरणाच्या काठी आहे कॅम्पिंग स्थळ व रेस्टोरंट आहे.
पवना धरणापासून तिकोना , तुंग व लोहगड यासारख्या अनेक ऐतिहासिक स्थळांच उत्कृष्ठ असं दृश्य पाहायला मिळत .
५. सिंहगड किल्ला (अंदाजे ३० किमी)
पुण्यातील सर्वात प्रतिष्ठित व पुणेकरांची पर्यटनासाठी पहिली पसंद म्हणजे सिंहगड किल्ला , गडावर पिठला भाकरी आणि कांदा भाजीसारखे महाराष्ट्रीयन पदार्थ साठी प्रसिध्दी आहे