“इशान किशननं द्विशतक झळकावलं, अणि माझं करिअर संपलं” शिखर धवन मनातलं बोलला!

भारताचा माजी क्रिकेटपटू शिखर धवनने २०२२ मध्ये बांगलादेशविरुद्ध अखेरचा सामना खेळाला आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतली . शिखर धवन हा भारतीय क्रिकेट संघातील एक डावखुरा सलामीवीर फलंदाज होता .तसेच त्याने “गब्बर” नावाने आपली ओळख निर्माण केली आहे . तसेच ” Mr. ICC” म्हणून देखील शिखर धवन ला ओळखले जाते . २०१३ ते २०२२ या काळात एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा शिखर धवन हा तिसरा खेळाडू आहे. शिखर धवन ची कारकीर्द बघून वाटतंय की, त्याने खूप लवकर निवृत्तीचा निर्णय घेतला. याच पार्श्वभूमीवर शिखर धवनने त्याच्या निवृत्तीमागचे खरे कारण सांगितले आहे. अगदी अश्यात च झालेल्या एका मुलाखतीत शिखर धवन म्हणाला की, २०२२ मध्ये इशान किशनने एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकावल्यानंतर मला जाणवले की आता माझे करिअर संपले आहे.
संघामध्ये जागा नाही भेटली मन्हून त्याने कोणालाही फोन केला नाही. त्याचं मन हलकं करण्यासाठी त्याच्याशी बोलले आणि भावनिक आधार दिला.पण माझी कोणाविरूद्धही तक्रार नाही, असे त्याने म्हटले आहे.

Leave a Comment