YouTube वर AI व्हिडीओची कमाई बंद! जाणून घ्या नवे नियम

 

जगभरात AI चा झपाट्याने प्रसार होत असताना, YouTube वर अनेक चॅनेल्स असे आहेत जे संपूर्णतः AI जनरेटेड कंटेंटवर आधारित व्हिडीओ तयार करतात — ज्यात ना स्वतःचा आवाज असतो, ना वैयक्तिक मतांची छाप.ना सर्जनशीलता.. यामुळे YouTube ने आता पॉलिसीमध्ये मोठा बदल करत “Original and Authentic Content” ला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे.

१५ जुलैपासून YouTube वर काय बदल पाहायला मिळणार?

  • AI Voice व्हिडीओवर कमाई थांबवली जाऊ शकते जर व्हिडीओमध्ये मानवी आवाज नसेल,

किंवा तो संपूर्ण AI generated असेल तर मोनेटायझेशन मिळणार नाही.

  •  टेम्प्लेटवर तयार झालेले व्हिडीओ रिजेक्ट होतील

जसे की एकसारखी स्लाईड्स, फिक्स्ड स्क्रिप्ट्स, किंवा विना-संपादनाचे व्हिडीओ.

  •  मास-प्रोड्यूस केलेलं (bulk बनवलेलं) कंटेंट बंदीच्या काठावर

दररोज १०-२० एका प्रकारचे अनोळखी व्हिडीओ टाकणाऱ्या चॅनेल्सवर कारवाई होईल.

काय टिकणार आहे (What Still Works):
AI वापरलेलं पण संपादित आणि वैयक्तिकृत केलेलं कंटेंट

तुमचा स्वतःचा आवाज, चेहरा, किंवा विचार असेल तर मोनेटायझेशन चालू राहील

AI visuals + तुमचं नैसर्गिक स्क्रिप्टनं केलेलं स्पष्टीकरण किंवा मार्गदर्शन

Creators साठी महत्त्वाचे टिप्स:
तुमचा स्वतःचा आवाज वापरा किंवा कमेंट्री जोडा

AI visuals असले तरी व्हिडीओत तुमचं दृश्य किंवा भावना असू द्या

AI वापर झालेला असेल तर अपलोड करताना “AI-Assisted” टॅग वापरा

कॉपी-पेस्ट स्क्रिप्ट्स, रेडीमेड AI व्हिडीओ टाळा

 काय होईल जर नियम तोडले?
मोनेटायझेशन थांबवले जाईल

चॅनेल demonetize (कमाई बंद) केला जाईल

वारंवार उल्लंघन केल्यास चॅनेल बंदही होऊ शकतो

 निष्कर्ष:
YouTube चा हा नवा धोरण बदल हा स्पष्ट संदेश देतो — सर्जनशील व्हा, मूळ रहा, आणि प्रेक्षकांशी जोडलेले रहा. तुम्ही AI वापरू शकता, पण तुमचा हस्ताक्षर आणि आवाज त्यामध्ये हवाच!

Leave a Comment